मंत्रालयात झालेल्या कालच्या बैठकीत झाला निर्णय;
बैठकीला बीडचे अतिरिक्त सीईओ सोळंके होते उपस्थित
बीड (रिपोर्टर) राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना विभागाने प्रत्येक कामाचे मजुराचे फोटो अपलोड केल्यानंतरच मस्टर काढण्याचा निर्णय घेतला होता. याला सर्वस्तरातून विरोध झाल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या ज्या वैयक्तिक योजना आहेत त्या कामावरच्या मजुराचे फोटो अपलोड करण्याच्या अटीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. काल रोजगार हमी योजना मंत्री आणि रोजगार हमी योजनेचे प्रधान सचिव यांच्या उपस्थितीमध्ये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या प्रतिनिधीची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला.
मंत्रालयात याबाबत काल बैठक झाली. या बैठकीला बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्याचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके हे या बैठकीला उपस्थित होते. या हमी योजनेचे जे सार्वजनिक कामे आहेत त्याच कामाचा मजुराचा सामुहिक फोटो मजुरांचे मस्टर काढताना अपलोड करावा, वैयक्तीक लाभाच्या ज्या रोजगार हमी योजनेच्या योजना आहेत त्या योजनेला मजुराचे फोटो अपलोड करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट आदेश प्रधान सचिवांनी दिले आहेत. सोबतच रोजगार हमी योजनेचे मस्टर असेल किवा काम असेल त्या कामावर ग्रामसेवकाने सही न करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबाबतही प्रधान सचीवांनी कोणताही आक्षेप न नोंदवत ज्या ठिकाणी सार्वजनिक किंवा वैयक्तिक कामामध्ये गटविकास अधिकार्याला दोषीही धरता येणार नाही, अशा प्रकारचे सकारात्मक बदल कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. गावपातळीवर ग्रामरोजगार सेवकानेच याबाबत सर्व प्रक्रिया पार पाडावयाची आहे.