बीड (रिपोर्टर) :- वरपगाव, भोपला शिवारात चंदण तस्करी करणार्या टोळीला केज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 12 किलो चंदणासह 55 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. केज पोलिसात तिघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील वरपगाव, भोपला शिवारात चंदन तस्करी होत असल्याची माहिती केज पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन 25 फेब्रुवारी रोजी वरपगाव, भोपला शिवारात चंदणाचा गाभा काढत असतांना राजेंद्र किसन काळे,फारुक पाशा ागवाण, दत्तत्रय नारायण तावरे सर्व रा. इंदिरानगर कळं जि. उस्मानाबाद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून 12 किलो चंदणासह दुचाकी आणि चंदण तस्करी करणारे साहित्य असा एकूण 55 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. केज पोलिसात कलम 379, 34 भादवि सह कलम 41,42, 26 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना गुंजाळ हे करत आहेत.