Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाविरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला


मुंबई (रिपोर्टर):- विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच पंतप्रधान संवेदनशील असून महाराष्ट्राला मदत करतील असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे कोकण दौर्‍यावर असून मालवणमधील चिवला बीच येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पंचनामे पूर्ण झाले असून याचा आढावा घेतल्यानंतर मदत जाहीर करु. केंद्राच्या निकषाप्रमाणे तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत, पण एकूण आढावा घेतल्यानंतर आणखी काय करायचं असेल ते आम्ही करणार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे आम्हीदेखील पंतप्रधानांना मोठ्या मदतीची अपेक्षा असल्याचं कळवलं आहे. पंतप्रधान संवेदनशील असून योग्य ती मदत करतील असा विश्वास आहे. राज्य म्हणून आम्हाला शक्य आहे ती सर्व मदत करु, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. बदलत्या हवामानामुळे राज्याच्या किनारपट्टीवर वादळं येऊ लागली आहेत. तौतेची भीषणता गेल्या दोन दशकातील सर्वाधिक होती. वादळांमुळे होणारं नुकसान रोखण्यासाठी कायमस्वरुपी आराखडा जिल्ह्यांनी तयार केला असून तो जलदगतीने पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी परवानगी आणि निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
पॅकेजवर माझा विश्वास नाही, उद्धव ठाकरेंचं कोकणवासीयांना मदतीचं आश्वासन कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिलं आहे, आता शिवसेना कोकणाली किती देते या फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देताना ते म्हणाले की, त्याची काळजी तुम्ही करु नका. कोकण आणि शिवसेनेचं नात घट्ट आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यात कमी जास्त काही होणार नाही.

हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी
करतोय, उद्धव ठाकरेंनी साधला मोदींवर निशाणा

मोदींकडून गुजरातची पाहणी करुन जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीवर विचारण्यात आलं असता आपल्याला त्यात राजकारण आणायचं नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी मी विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळे वैफल्यग्रस्त नाही असा टोला लगावला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!