बीड (रिपोर्टर) राज्य सरकारने शेतकर्यांना खरीप पिकाची नुकसान भरपाई जाहीर करून अनेक महिने लोटले मात्र अद्यापही शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. शेतकर्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमपा करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुण शेतकर्यांनी तीव्र निदर्शने केली. सदरील हे आंदोलन धनंजय गुंदेकर यांच्या नेतृत्वात झाले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्यांना नुकसानभरपाई अद्यापही मिळालेली नाही. त्याबरोबर विम्याचा लाभ मिळाला नाही. कापसाचे भाव कमी झाले, कांद्याचं प्रचंड वांदं झालं असून कांदा उत्पादक शेतकर्यात संताप व्यक्त केला जात आहे. एकूणच शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार गंभीर नसून शेतकर्यांचे प्रश्न तात्काळ सोडवून अनुदान खात्यावर जमा करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्यांनी तीव्र निदर्शने केली. शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. ‘अनुदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ यासह इतर घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. हे आंदोलन धनंजय गुंदेकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी अनेक शेतकर्यांची उपस्थिती होती. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.