Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनारस्त्यावरील 284 चाचण्यात 13 पॉझिटिव्ह

रस्त्यावरील 284 चाचण्यात 13 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन असतांनाही बहुंताश नागरीक घराच्या बाहेर पडतात. बाहेर पडणार्‍या नागरीकांच्या अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या जातात. आज दुपारपर्यंत 284 जणांची चाचण्या केल्या असून यामध्ये 13 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लावलेले आहे. नियमावली कठोर असतांना अनेक नागरीक विनाकारण बाहेर पडतात. त्यातच सडक फिर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. रस्त्याने फिरणार्‍या नागरीकांची अ‍ॅन्टीजन टेस्ट केली जाते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह अन्य रस्त्यावर वाहन धारकांची चौकशी करुन त्यांची अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात येते. आज दुपारपर्यंत 284 जणांची चाचणी करण्यात आली. यात 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!