बीड, (रिपोर्टर):- 31 मार्च 2023 पर्यंत महसूल आणि गौण खनिजचे उद्दीष्ट महसूल अधिकार्यांनी सादर करावे. मतदान विषयक कामकाजाचाही आढावा प्रत्येक 8 दिवसाला अद्यावत सह अनेक सूचना आज जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुधोळ/मुंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिल्या.
जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहामध्ये जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी आणि सहाय्यक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांची बैठक घेण्यात आली. प्रत्येक तालुक्याला 31 मार्च 2023 अखेर महसूल आणि गौण खनिज विभागाची वसुलीचे उद्दीष्ट दिलेले आहे. अनेकदा हे अधिकारी महसूल विभागाने जे दिलेले उद्दीष्ट आहे ते साध्य होत नाही त्यामुळे आपआपल्या विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडून वसूलीबाबत आढावा घेण्यात यावा. निवडणूक विषयी कामाचा आढावाही घेण्यासाठी आपआपल्या कार्यालयामध्ये गावपातळीवरील मतदार नोंदणी अधिकार्याची बैठक घेण्यात यावी, एकच नाव दुबार पद्धतीने मतदान यादीत येणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी, यासह अनेक सूचना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या बैठकीत दिल्या.