Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमअज्ञात चोरट्याने चोरलेले बैलै बांधले पांढरवाडीच्या शेतकर्‍यांच्या शेतात

अज्ञात चोरट्याने चोरलेले बैलै बांधले पांढरवाडीच्या शेतकर्‍यांच्या शेतात


ओळख पटवून बैल घेऊन जाण्याचे पोलिसांचे आवाहन

गेवराई (रिपोर्टर) अज्ञात चोरट्यांनी चोरीचे बैल पांढरवाडी शिवारातील शेतात बांधुन चोरटे फरार झाल्याची घटना घडली असून सकाळी शेतकरी शेतात गेला असता त्यांना तीन बैले आढळून येताच सदरील माहिती ग्रामपंचायतीला दिली त्यानंतर ही कल्पना गेवराई पोलिसांना देताच पोलिसांनी बैलांची ओळख पटवून बैल घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे.


या बाबत मिळालेली माहिती अशी की, पांढरवाडी येथील शेतकरी सुरेश जाधव शनिवारी सकाळी पांढरवाडी शिवारातील आपल्या शेतात गेले असता त्या ठिकाणी त्यांना तीन बैले आढळून आले यानंतर शेतकरी सुरेश जाधव यांनी आजूबाजूस विचारणा केली असता तीन बैले कुणाचेच नसल्याचे समजले चोरीचे बैले असल्याचा संशय आल्यानंतर पांढरवाडी तील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र टकले यांच्याशी संपर्क साधून बैले ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले. ग्रामपंचायतीच्या वतीने पोलिसांना कळवून माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कळवले की बैले ज्यांचे असतील त्यांनी ओळख पटवून घेऊन जाणे असे सांगितले आहे.

Most Popular

error: Content is protected !!