बीड (रिपोर्टर)ः- केज, अंबाजोगाई बस प्रवास करत असतांना एका महिलेची पर्स अज्ञात व्यक्तीने लांबविल्याची घटना 02 मार्च रोजी घडली. या प्रकरणी काल महिलेने केज पोलीसात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लताबाई दादाराव अंबाड वय-55 वर्षे, रा.कुलस्वामीनी कॉलनी अंबाजोगाई या 02 मार्च रोजी केज अंबाजोगाई
प्रवास करत असतांना त्यांनी आपल्या पर्समध्ये चार ग्रामची सोन्याची अंगठी, दहा ग्रामचे लॉकेट, पाच गॅमचे वाळे, दहा ग्रामचे सेवनपिस व विस हजार रुपये ठेवले होते. अज्ञात व्यक्तीने ति पर्स लांबवली. या प्रकरणी त्यांनी काल केज पोलीस ठाणे गाठून अज्ञाताविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस हवालदार निरडे हे करत आहे.












