बीड (रिपोर्टर)ः- घर खाली करा, घराच्या बाहेर निघा असे म्हणून तिघा अज्ञात हल्लेखोरांनी काठीने मारहाण करुन पती पत्नीला गंभीर जखमी केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील आजी माजी सैनिक कॉलनीत 7 मार्च रोजी घडली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात काल अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावसाहेब बाबुराव फड हे अंबाजोगाई शहरातील आजी माजी सैनिक कॉलनीत स्वताःच्या घरात राहतात. ते दुपारी घरी असतांना अज्ञात तिन हल्लेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश करत घर आताच्या आता खाली करा असे म्हणत काठीने मारहाण केली. त्यांच्या पत्नी कौशल्या यांच्या डोक्यातही विटा मारुन गंभीर जखमी (पान 7 वर…)
केले. या प्रकरणी त्यांनी अंबाजोगाई शहर पोलीसात दिलेल्या तक्रारीवरुन कलम 326,504, 506, 34 भादवी सह कलम 4, 25 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी अटक झालेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बोडके हे करत आहे.