बीड(रिपोर्टर): येथील रिपाइं मध्यवर्ती कार्यालयाला रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे (दि.10) मार्च रोजी बीड नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. रिपाइं युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नियोजनातून उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. बीड नगर पालिका येथून रिपाइं मध्यवर्ती कार्यालयापर्यंत रॅली काढून स्वागत करण्यात आले. या रॅलीत जिल्हाभरातील रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा उस्मानाबाद येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा औरंगाबाद ते उस्मानाबाद असा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौर्यानिमित्त बीड येथील रिपाइं मध्यवर्ती कार्यालयात त्यांनी आवर्जून भेट दिली. या दौर्यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी समाजाचे प्रश्न आणि विविध विषयांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री रामदास आठवले म्हणाले की, समाजाचे प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावण्यासाठी रिपाइं काम करत आलेली आहे. यानंतरही रिपाइं विविध प्रश्नांवर आणि अन्याय अत्याचारावर आवाज उठवित राहील. असा संवाद
मंत्री रामदास आठवले यांनी रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित करतांना व्यक्त केला. बीड येथील कार्यालयाच्या भेटीनंतर मंत्री रामदास आठवले यांचे उस्मानाबादकडे प्रस्थान झाले. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सत्कारात कोणत्याही प्रकारची कसर राहू नये म्हणून युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेवून नियोजन केले होते. यावेळी बाबुराव कदम, राजेंद्र मस्के, अड.सर्जेराव तांदळे, राजू जोगदंड, सचिन कागदे, मजहर खान, गोवर्धन वाघमारे,अरुण निकाळजे,अशोक साळवे, किसन तांगडे, प्रभाकर चांदणे, दीपक कांबळे, नरेंद्र जावळे, अरुण भालेराव, गौतम बचुटे, रवी जोगदंड, सुभाष तांगडे, दशरथ सोनवणे, किशोर कांडेकर, महादेव उजगरे, राणिताई अविनाश जावळे, गणेश लांडगे, अविनाश जोगदंड, महेश आठवले, शाम वीर, गणेश वाघमारे, नामदेव वाघमारे, दिलीप खंदारे, रंजित शिनगारे, राणिताई गायकवाड, मायताई मिसळे, रेश्माताई जोगदंड, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, दीपक अरुण, भय्यासाहेब मस्के, पप्पू वाघमारे, महेंद्र वडमारे, भाऊसाहेब दळवी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मंत्री रामदास आठवले यांच्या जंगी स्वागताला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून आमच्यासोबत यावे-केंद्रीय राज्य मंत्री आठवले
बीड (रिपार्टर)ः- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांचा सामना करणं हे एड्या गबाड्याचं काम नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाचा वरचष्मा राहीला. येत्या काही महिन्यात कर्नाटकासह इतर राज्याच्या निवडणुका होणार आहे. त्यातही भाजपासह मित्र पक्षांचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करत नागालँड मध्ये पवारांनी आमच्या आघाडीला पाठींबा दिला त्याबद्दल मी पवार यांचे अभिनंदन करतो. पवारांनी महाआघाडीतून बाहेर पडून आमच्या सोबत यावे असं आमंत्रण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.
आठवले हे मराठवाड्याच्या दौर्यावर होते. सकाळी ते छत्रपती संभाजी नगरहून धाराशीवला जात असतांना बीड येथील रिपाई कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलतांना आठवले म्हणाले की, भाजपासह मित्र पक्षाशी ताकद वाढली आहे. मोंदीचं नेतृत्व मोठं आहे. नुकत्याच झालेल्या नागालँड सह इतर राज्याच्या निवडणुकीत भाजपासह मित्र पक्षाचं सरकार आलं. नागालँडमध्ये जे सरकार अस्त्विात आलं. त्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठींबा दिला. त्याबद्दल मि शरद पवार यांचे अभिनंदन करतो. पवारांनी महाआघाडीतून बाहेर पडून आमच्या सोबत यावे असे आमंत्रण देत आठवले पुढे म्हणाले मोंदीचा सामना करणं हे एड्या गबाड्याचं काम नाही. मोदी हे विकासाभिमुख नेतृत्व आहे. देशभरामध्ये मोदीमुळे विकास होत आहे. येत्या काही महिन्यात कर्नाटकासह इतर राज्याच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत देखील भाजपा एनडीएचा वरचष्मा राहील असा आत्मविश्वास आठवले यांनी व्यक्त केला. दलीत एक्याबाबत प्रश्न विचारला असता. आठवले म्हणाले की, अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी याबाबत पुढाकार घ्यावा मी दोन पाऊले मागे घ्यायला तयार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. यावेळी रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे सह आदिंची उपस्थिती होती.