बीड (रिपोर्टर) मराठवाड्यामधील 300 शाळांचा 17 मार्च रोजी एकाच वेळी इयत्ता तिसरी, पाचवी व आठवी वर्गाचे राज्यस्तरीय संपादणूक सर्व्हेक्षण केले जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने हे सर्व्हे होणार आहेत. यात बीड जिल्ह्यातील 437 शाळांचा सहभाग आहे.
राज्यात विद्यार्थ्यांच्या अध्ययन निश्चितीसाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय संपादणूक चाचणी घेतली जाते. यापुर्वी सन 2017 व सन 2021 मध्ये या चाचण्या झाल्या होत्या. आता राज्य शासनाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यस्तरीय संपादणूक सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सर्व्हे 17 मार्चपासून होत असून बीड जिल्ह्यातील 437 शाळांमधील तिसरी, पाचवी आणि आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. मराठवाडयातील 300 शाळांचा यात सहभाग आहे. एकाच वेळी मराठवाड्यामध्ये हा सर्व्हे करण्यात येणार आहे. मराठी व गणित विषयाची ही परीक्षा असणार आहे. इयत्ता तिसरी व पाचवी वर्गासाठी मराठी भाषेचे 20 तर गणिताचे 25 असे 45 प्रश्न असणार आहे. त्यासाठी दीड तासाचा वेळ असणार आहे.