Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडजिल्हाधिकारी कार्यालयासह ग्रा.पं. समोर महिलांचे धरणे गेल्या वर्षीचा पीक विमा शेतकर्‍यांना मिळाला...

जिल्हाधिकारी कार्यालयासह ग्रा.पं. समोर महिलांचे धरणे गेल्या वर्षीचा पीक विमा शेतकर्‍यांना मिळाला नाही


विमा न मिळाल्यास
तीव्र आंदोलन -थावरे
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पीक विमा भरूनही शेतकर्‍यांना विम्याची रक्कम कंपनीने दिली नाही. विम्याची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी आज शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया-समोर धरणे आंदोलन केले तर गावपातळीवर अनेक गावच्या महिलांनी ग्रा.पं.कार्यालयासमोर आंदोलन करत आपल्या मागण्याचे निवेदन सरपंच व ग्रामसेवकांना देण्यात आले.

gangabhishan thware

गेल्यावर्षी बीड जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांनी पीक विमा भरला होता. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापुस, मुग, उडीद इत्यादी खरीप पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीचे महसूल विभागाने पंचनामेही केले
होते. मात्र नुकसान भरपाई विमा कंपनीकडून देण्यात आली नाही. शेतकर्‍यांच्या पैशावर कंपनीने डल्ला मारला. शेतकर्‍यांना विम्याची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी आज शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले तर बीड जिल्ह्यातल्या अनेक गावामधील महिलांनी ग्रा.पं.कार्यालयासमोर आंदोलन केले. बीड तालुक्यातील घाटसावळी, केज तालुक्यातील वरपगाव, शिरूर तालुक्यातील मातोरी, अंबाजोगाई तालुक्यातील पुस, माजलगाव तालुक्यातील आनंदगाव याठिकाणच्या महिलांनी आंदोलन करत आपल्या मागण्याचे निवेदन सरपंच आणि ग्रामसेवकांना देण्यात आले. दरम्यान विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी नसता तिव्र स्वरूपो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे.

Most Popular

error: Content is protected !!