बीड (रिपोर्टर)ः- नॉनसेन्स सारखा काय वागतायं, लोकांना वेठीस काय धरतायं, तुमच्या ज्या मागण्या आहे त्या न्यायीक पध्दतीने मांडा मी हे खपवून घेणार नाही, असे म्हणत जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांनी बेशिस्त संपकर्यांना खडसावले. संपकर्यांनी आज थेट रजिस्ट्री ऑफीसमध्ये घुसून तेथील कर्मचार्यांना बाहेर काढले होते. त्यानंतर ते जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तेव्हा दिपा मुंडे यांनी आक्रमक होत बेशिस्त संप करी कर्मचार्यांना धारेवर धरलं. त्यानंतर व्यवस्थीत त्यांच्या मागण्या, त्यांच्या म्हणणं ऐकूण घेतलं. सदरचा प्रकार आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक असे की, गेल्या तिन दिवसापासून जुन्या पेन्शनची मागणी लावून धरत कर्मचार्यांनी संप पुकारला. या संपामुळे सर्वच कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. काल कर्मचार्यांनी मोर्चाही काढला. त्या मोर्चामध्ये त्याचं बेशिस्त वागणं, नाचणं गाणं याचे तिव्र पडसाद जनतेच्या संतप्त प्रतिक्रियातुन उमटतांना दिसूनही आले. आज सकाळी संपकरी कर्मचार्यांनी तेथ चालू असलेल्या रजिस्ट्री कार्यालयाला लक्ष केलं. कार्यालयात घुसून जे काही बोटावर मोजणे इतके कर्मचारी काम करत होते त्या कर्मचार्यांना बाहेर काढले. याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना झाल्यानंतर त्यांनी पुन्हा ते कार्यालय आणि कामकाज सुरू केले. या दरम्यान काही काळ रजिस्ट्री ऑफीस परिसरामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सदरचा प्रकार घडल्यानंतर संपकरी कर्मचारी जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेव्हा जिल्हाधिकारी दिपा मुंडे या दालनाबाहेर आल्या. आणि उपस्थित संपकर्यांवर भडकल्या. नॉनसेन्स सारखं काय वागता? लोकांना वेठीस का धरता? मी हे खपवून घेणार नाही. मला जास्त वेळ लागणार नाही, असं म्हणत संप कर्यांवर चांगल्याच भडकल्या. नंतर त्यांनी उपस्थित संपकर्यांचे म्हणणे एकूण घेतले.