Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनादिलखुश! बाधितांचा ३३ वरचा टक्का ७.५ टक्क्यावर आला बीडमध्ये सडकफिर्‍यांच्या बेशिस्तीचा टक्का...

दिलखुश! बाधितांचा ३३ वरचा टक्का ७.५ टक्क्यावर आला बीडमध्ये सडकफिर्‍यांच्या बेशिस्तीचा टक्का मात्र प्रचंड वाढला


बीड (रिपोर्टर):- गेल्या महिन्यात कोरोनाचा व्हॉटस्पॉट ठरलेल्या बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा टक्का थेट ३३ टक्क्यावर जावून पोहचला होता. मात्र गेल्या पाच दिवसाच्या कालखंडात कोरोना बाधितांचा आकडा कमी होत चालला असून बाधितांचा टक्का आज ७.५ टक्क्यावर येवून पोहचला आहे. ३ हजार ४१४ संशयितांचे स्वॅब तपासले असता आज केवळ २६५ बाधित मिळवून आले आहेत. ही बाब आनंददायी असली तरी दुसरीकडे मात्र शशर्थ अनलॉक बीडमध्ये सडकफिर्‍यांचा बेशिस्तीचा टक्का प्रचंड वाढल्याचे दिसून आले. आज मोंढा भागात खरेदीसाठी तुंबळ गर्दी पहावयास मिळाली तर सुभाष रोड, भाजी मंडई, धोंडिपुरा, कारंजा आदी परिसरातही लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. हा बेशिस्तपणा पुन्हा एकदा कोरोना घेवून येईल की काय?
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रूग्ण संख्या प्रचंड वाढली. ३३ टक्क्यापेक्षा जास्त बाधितांचा आकडा तब्बल ५० ते ६० दिवस येत राहिला. आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टर, नर्स यांच्यासह कोरोना योद्ध्यांनी रात्रीचा दिवस केला. तेंव्हा कुठे कोरोना बाधितांचा आकडा पीक सिजनच्या बाहेर येत राहिला. गेल्या पाच-सहा दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी-कमी होत असून ही बाब आनंददायी असून ३३ टक्क्यावरून आज बाधितांचा टक्का हा ७.५ टक्क्यावर आला आहे. ३ हजार ४१४ संशयितांचे स्वॅब तपासले असता आज २६५ बाधित मिळून आले. एकीकडे ही बाब दिलखुश करणारी आहे परंतू दुसरीकडे बीड शहरातील विविध भागात लोकांनी जी गर्दी केली ती गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी दिसून आली. बीडसह परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, गेवराई माजलगाव आदी तालुक्यातही काही ठरावीक ठिकाणी गर्दी करत असल्याचे पहावयास मिळते. जिल्हा प्रशासनाने शशर्थ अनलॉक केले असून लोकांनी अद्यापही निर्बंध पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र ते आवाहन सर्वसामान्य पायदळी तुटवतांना दिसून येत आहेत. कोरोना रोखायचा असेल तर आणखी १५ ते २० दिवस शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन केले पाहिजे असे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी रिपोर्टरशी बोलतांना सांगितले. कोरोना हद्दपार करणे हे सर्वसामान्य नागरीकांच्याच हातात असून त्यांनी सोशल डिस्टंससह मास्कचा वापर करून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे ते म्हणाले.

तालुकानिहाय आजचे बाधित
आंबाजोगाई १४, आष्टी ३१, बीड ५७, धारूर १५, गेवराई ३१, केज ३३, माजलगाव १९, परळी ५, पाटोदा १५, शिरूर २९ आणि वडवणी तालुक्यात १६ रूग्ण आढळून आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!