केज -ऑनलाईन रिपोर्टर
केज तालुक्यातील पैठण सावळेश्वर येथे दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर येत असून गावातील तीन अल्पवयीन मुले शेतातील शेततळ्यात पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले . घटनेने गावावर शोककळा पसरली आहे घटनेची माहिती समजताच घटनास्थळाकडे युसुफवडगाव पोलिसांनी धाव घेतली आहे
केज पासून १५ कि मी अंतरावर असलेल्या पैठण सावळेश्वर येथील शेतात असलेल्या शेततळ्यात तीन आठ ते पाच वयोगटातील मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती येत असून या दुर्घटनेत स्वराज जयराम चोधरी ,पार्थ श्रीराम चोधरी , श्लोक गणेश चौधरी या तीन लहान मुलांचा समावेश आहे . घटना नेमकी कशी घडली हे अद्ध्यप समजू शकले नसले तरी युसुफवडगाव पोलीस घटना स्थळी पोहोचले आहेत