छेडछाडीच्या वादातून तरुणाचा खून
अपघाताचा केला बनाव, एका तासात पोलिसांनी घातपाताचा लावला छडा
परळी (रिपोर्टर):- भावकितील महिलेची छेड काढल्याच्या रागातून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना पोलिस तापासातून उघड झाली आहे. शनिवारी भर दिवसा शहरातील उड्डानपुलावर घडलेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचा अपघात नसून खून असल्याचे परळी शहर पोलिसांनी अवघ्या एका तासात उघड करत आरोपीच्या मुसक्या बांधल्या आहेत.
भरधाव पिकअपने दुचाकीस्वराला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण जागीच गतप्राण झाल्याची घटना शहरातील शाम मुखर्जी उड्डाण पुलावर शनिवारी दुपारी घडली होती. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्या दरम्यान हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या निदर्शना आल्याने पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले असता घातपाताचा धक्कादायक प्रकार समोर आला.
डांबी येथील तरुण संपत्ती भारत पारवे (वय 23 वर्षे, रा. डांबी ता. परळी) हा आपला मित्र निकम केरबा एंगडे रा. डांबी) याच्या सोबत दुचाकीवरुन शहरातील शाम मुखर्जी उड्डाण पुलावरुन शनिवारी दुपारी जात असतांना पाठीमागून आलेल्या पिकप (क्र.एम.एच 21 एक्स-5713) ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये संपत्ती भारत पारवे हा तरुण जागीच ठार झाला तर निकम केरबा एंगडे हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्रथमदर्शी हा अपघात असल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिहताच शहर पोलिस ठाण्याचे प्रमुख सलीम चाऊस यांनी सपोनि ठाकूर, पोह.बिकट, पोना शिंदे, मस्के, कोकाटे दुर्गे यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी बारकाईने पंचनामा केला असता हा अपघात नसून घातपास असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मयत तरुणाविषयी पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता. त्याने गावातील एका महिलेची काही दिपवापूर्वी छेडछाड केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. अन् छेडछाड झालेल्या महिलेच्या दिरानेच हा घातपात घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यावरुन त्यांनी राम बाबु पारवे वय (25 वर्ष रा. डाबी) यास अंबाजोगाईतून ताब्यात घेतले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेहरकर ठोणप्रमुख सलिम चाऊस यंाच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ठाकूर, पोह. बिकट, पोना शिंदे, मस्के, कोकाट,े दुर्गे यांनी केली.