नेकनूर (रिपोर्टर):- बीड तालुक्यातील सोनपेठवाडीत आज सकाळी किरकोळ कारणावरून 3 महिलांसह कुटुंबास लाथा बुक्या आणि काठीने मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तीन महिला जखमी झाल्या असुन नेकनुर स्त्री रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की, काल दि.12-06-2021 रोजी सकाळी बीड तालुक्यातील सोनपेठवाडीतील गोपिचंद नागरगोजे आणि उत्रेश्वर भटे यांच्यात किरकोळ कारणावरून कुरबुरी झाली होती. यानंतर हा वाद तिथेच मिटवण्यात आला होता. परंतु आज सकाळी पुन्हा गोपिचंद नागरगोजे,शरद नागरगोजे,विक्रम नागरगोजे,लक्ष्मण नागरगोजे, छंदर नागरगोजे यांनी बैठक घेऊन वाद मिटवायचा आहे असे उत्रेश्वर भटे आणि त्यांचे मेहुणे ईश्वर कालगुडे यांना बोलावून घेतले. यानंतर 5 ते 6 जणांनी लाथाबुक्क्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. हि मारहाण पाहुन शांताबाई कालगुडे वय (वय-60), मीना भटे (वय-30), सुमनबाई भटे (वय-50) या तिकडे गेल्यानंतर त्यांनाही मारहाण करण्यात आली. यानंतर जखमी अवस्थेत महिला आणि त्यांचा परिवार नेकनूर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना नेकनूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन्ही गट परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यासाठी प् नेकनुर पोलीस ठाण्यात आले आहेत.