माजलगाव (रिपोर्टर):- तुझ्यासोबत लग्न करुन मी फसलो, तु काळी आहेस असे म्हणून विवाहीतेला सतत मानसीक आणि शारीरीक त्रास देत ती झोपेत असतांना तीचा खून केल्याची धक्कादायक घटना माजलगाव शहरातील फुले नगर भागात घडली. या प्रकरणी माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बानोबी रफिक शेख (रा. फुलेनगर माजलगाव) असे खून झालेल्या विवाहीतचे नाव आहे. माजलगाव शहरातील फुलेनगर भागात राहणार्या रफिक शेख यांच्यासोबत बानोबी हिचा विवाह झाला होता. मात्र तेव्हापासून तीला त्रास देणे सुरु होतो. दि. 6 मार्च रोजी बानोबा झोपेत असतांना तीच्या डोळ्यावर, कानावर गंभीर दुखापत करुन खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मयत बानोबी हिचा भाऊ सय्यद तारेख अब्दुलमन्नान (रा. महमदिया कॉलनी, बीड) यांनी माजलगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन काल दि. 25 मार्च रोजी शेख रफीक शेख खलील, शेख आरीफ उर्फ लतु शेख खलील, शेख रईस शेख खलील, सिमा यांच्यावर कलम 302, 498,(अ), 323, 504, 34 भादवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय शितलकुमार बल्लाळ हे करत आहेत.