धर्मापुरीत 15 कोटी 57 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ; किल्ला संवर्धन 9 कोटी 30 लाख, पाणी पुरवठा 3 कोटी 57 लाख यांसह विविध कामांचा समावेश
परळी (रिपोर्टर): परळी मतदारसंघातील जनतेने माझ्यावर प्रेम केले त्या जनतेच्या प्रेमाशी मी प्रामाणिक आहे. माझे इमान इथल्या मातीशी आणि मातीतील माणसाशी आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विकासकाम करताना ऍड. गोविंद फड यांच्यासारखे सहकारी माझ्या सोबतीला आहेत, त्यांच्या माध्यमातून धर्मापुरी मध्ये आदर्श विकास करून दाखवू, भविष्यात धर्मापुरी हे गाव विकासाचे उदाहरण म्हणून पाहिले जाईल, असे प्रतिपादन आ. धनंजय मुंडे यांनी केले आहे.
मतदारसंघातील धर्मापुरी येथे धर्मापुरी किल्ला दुरुस्ती व संवर्धन करण्यासाठी 9 कोटी 30 लाख रुपये त्याचबरोबर जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा योजनेच्या 3 कोटी 57 लाख रुपये, केदारेश्वर मंदिर विकासाच्या 1 कोटी 74 लाख रुपये, सामाजिक न्याय विभागाकडून मंजुर सामाजिक सभागृहाच्या कामासाठी 1 कोटी असे एकूण 15 कोटी 57 लाख रुपयांच्या कामांचा आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. धनंजय मुंडे यांचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. जलजीवन मिशनच्या माध्यमातून आज जिल्ह्यात शेकडो गावांमध्ये हजारो कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आलीत. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना हा आराखडा मंजूर करण्यात आला होता. पाणी पाजणे हे पुण्याचे काम, त्यामुळे पक्षपातीपणा किंवा राजकारण न आणता पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या. शेवटी सत्ता असो वा नसो,
माझी बांधिलकी जनतेशी आहे, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी बोलताना म्हणाले. यावेळी माजी आ. संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, अजय मुंडे, शिवाजीराव सिरसाट, प्रा. मधुकर आघाव, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, सूर्यभान नाना मुंडे, पिंटू मुंडे, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शिवहर भताने, माऊली तात्या गडदे, बाळासाहेब माके, माधवराव लव्हारे, शिरीष नाकाडे, माधव मुंडे, चंद्रकांत चाटे, कल्पेश लांडगे, भास्कर आवळे, धनराज फड, रमेश करपे, बबनराव मुंडे, संजय आघाव विश्वम्भर फड, इंद्रजित होळंबे, काशिनाथ कातकडे, प्रकाश चाटे, बालाजी आंधळे, अशोक गुट्टे, अशोक चाटे, गोविंद कांदे, भागवत फड, सोपान फड, रामहरी दौंड, बाबुराव दहिफळे, सुदाम गायकवाड, भगवान फड, सज्जन दराडे, बालाजी कातकडे, व्यंकट सोनवणे, बबनराव सोनवणे, महेश गित्ते, धर्मापुरीचे सरपंच ऍड. गोविंदराव फड, ख्वाजा भाई कुरेशी, गफ्फार भाई कुरेशी, अशोक फड, वैजनाथदादा फड, पांडू फड, गिरीधारी फड, अय्युबभाई शेख, दिलीप जोशी, श्रीमंत दमा, मनोहर पांचाळ, रामकीसन रणबांबरे, माऊली घोबाळे, दगडू कासरे, सिद्धेश्वर फड, लक्ष्मण फड, चंदू कोळगावे, माणिक फड यांसह विविध गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.