Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडकुंभारी गावचा पुर्नवसनाचा प्रश्न सोडवला नाही मुसळधार पावसाने अनेक नागरीकांच्या घरांची पडझड

कुंभारी गावचा पुर्नवसनाचा प्रश्न सोडवला नाही मुसळधार पावसाने अनेक नागरीकांच्या घरांची पडझड


नेकनूर (रिपोर्टर)ः- कुंभारी येथे तलाव बांधण्यात आल्याने येथील गावंकर्‍यांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नाही. स्थलांतर होणार असल्याने गावकर्‍यांना पक्की घरे बांधण्यास अडचण येत आहे. त्यातच काल मुसळधार पाऊस पडला. या पावसात अनेक ग्रामस्थांची घरे पडले आहे. सुदैवाने कुठलिही जिवीत हाणी झाली नाही. प्रशासनाने आता तरी पुर्नवसन करुन गावकर्‍यांची समस्या दुर करावी अशी मागणी केली जात आहे.
गेल्या पंधरा सोळा वर्षापासून कुंभारी गावकर्‍यांचा पुर्नवसनाचा प्रश्न प्रलंबीत आहे. याठिकाणी तलाव झाल्याने गावकर्‍यांना इतर ठिकाणी हलवण्यात येणार आहे. कोठे हलवण्यात येणार याबाबत अद्याप निश्चीत करण्यात आले नाही. स्थलांतरीत होणार असल्याने गावकर्‍यांना पक्की घरे बांधता येत नाही. आहे त्या जुन्या घरात गावकर्‍यांना राहावे लागत आहे. अनेकांची घरे पडायला झाली. अशा धोकादायक घरात गावकरी जिव मुठीत धरून राहत आहे. काल मुसळधार पाऊस पडल्याने यात काही नागरीकांच्या घराची पडझड झाली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हाणी झाली नाही. प्रशासनाने आता तरी पुर्नवसनाचा प्रश्न हाती घेवून गावकर्‍यांचे पुर्नवसन करावे जेणे करुन त्यांना आपली पक्के घरी बांधता येतील.

Most Popular

error: Content is protected !!