बीडच्या मराठा वधू वर सूचक मेळाव्यास पालकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद; एक दिवस मुलांसाठी मुलांच्या भविष्यासाठी
बीड(रिपोर्टर): सर्व समाजामध्ये विभक्त कुटुंब पद्धत सुरू झाल्यामुळे मुलांच्या विवाह साठी विविध समस्यांचा पालकांना सामना करावा लागत आहे. या सर्व बाबींच्या अनुषंगाने मराठा समाजाने आज बीड मध्ये वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते. आज (ता. 26) सकाळी नारायणगडचे महंत शिवाजी महाराज व मेंगडे महाराज यांच्या शुभहस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. या वधू वर सूचक मेळाव्यामध्ये 988 मुलं व मुली सहभागी झाल्या होत्या या मेळाव्यासाठी मराठा समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा पुढाकार घेऊन हा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक मुलांना लग्नकार्यासाठी मोठी मदत मिळणार आहे यात विशेष म्हणजे दोन लाख पगार असणारा मुलाला सुद्धा मुलगी मिळत नव्हती ही खंत कुठेतरी या मेळाव्यातून भरून निघेल ही आशा आहे आणि या मेळाव्याचा विभक्त कुटुंब असणार्या पालकांना मोठा फायदा होणार हे मात्र निश्चित.
दिवसेंदिवस विभक्त कुटुंब पद्धत आपल्याकडे अवलंबली जात आहे यामुळेच अनेक परिवारांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे व सर्वांशी सुसंवाद असल्यामुळे मुलांची व मुलींची लग्न वेळेत होत होते परंतु सध्याची विभक्त कुटुंब पद्धत व असलेला अल्प सुसंवाद यामुळे मुलांची लग्न वेळेवर होत नसल्यामुळे अनेक कुटुंबांना मुलांच्या व मुलींच्या लग्नासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे हे मात्र सर्व समाजाचे दुर्भाग्य आहे या सर्व अडचणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील मराठा समाजाने आज बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स या ठिकाणी मराठा वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वधुवर सुचक मेळाव्यामध्ये 988 मुला मुलींनी सहभाग घेतला होता हा मेळावा पार पडावा यासाठी मराठा समाजातील अनेकांनी हातभार लावल्यामुळे हा देखणा सोहळा बीड शहरांमध्ये पार पडला. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते.