गेवराई (रिपोर्टर):- कोरोनाची ही महामारी अत्यंत गंभीर आहे. कोरोना अनेकांनी अनुभवला आहे, अनेकांच्या घरातले कर्ते माणसे देवाघरी गेली आहेत. या भयावह परिस्थितीत आपल्या माणसांना आधार देण्यासाठी गेवराई तालुक्यात पहिले खासगी क्वॉरंटाईन सेंटर सुरू करण्याचे धाडस आ. अमरसिंह पंडितांनी केले ते गेवराईकरांच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांची जनतेशी नाळ कायम आहे. म्हणूनच ते आज बीड जिल्ह्यातील कोविड योद्धांचा सन्मान करत आहेत. सन्मानाचा पहिला मानही गेवराईकरांनीच मिळवा. पहिल्या लाटेत माणुसकी गेली, दुसर्या लाटेत ती जीवंत झाली आता तिसरी लाट नको, भगवंत करो, कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नये. असं म्हणत तिसरी लाट रोखायची असेल तर मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सातत्याने हात धूणे हे आपल्याला करावेच लागेल, असे स्पष्ट मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

ते गेवराई येथे आयोजीत कोविड योद्धांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आ. सतीश चव्हाण, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, जि.प. अध्यक्षा शिवकन्या सिरसट, माजी आ. अमरसिंह पंडित, जि.प.चे माजी अध्यक्ष तथा जि.प. सदस्य विजयसिंह पंडित, महेबूब शेख, डॉ. नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, पृथ्वीराज साठे, डॉ. सुरेश साबळे, डॉ. संजय कदम, डॉ. महादेव चिंचोले, शेख एजाज हे उपस्थित होते. पुढे बोलताना ना. मुंडे म्हणाले की, गेवराई तालुक्यात पहिले खासगी क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचे धाडस आ. अमरसिंह पंडित यांनी केले. ते गेवराईकरांच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात. निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांची जनतेशी असलेली नाळ कायम आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोविड योद्धांचा सन्मान करण्याचा पहिला मान गेवराईकरांनी मिळवला. कोविडसारखी ही महामारी अत्यंत गंभीर आहे ती अनेकांनी अनुभवली. या महामारीत अनेकांनी घरातील कर्ता माणूस गमावला. कोरोनाने माणुसकी मारल्याचा अनुभव मी स्वत: घेतला. मला दोन वेळा कोरोना झाला, पहिल्या लाटेत मी जेव्हा बाधीत झालो तेव्हा कोरोनामुळे कोणालाही जवळ येता आलं नाही तेव्हा वाटलं आपण एवढी माणसे सांभाळली, आपल्यासाठी मात्र कोणीच नाही, मात्र दुसर्या लाटेत प्रत्येकाला धैर्य दिले, कोरोनाच्या रुग्णाला योग्य उपचार मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. म्हणूनच आज हा आपण सन्मान सोहळा घेत आहोत. आजघडीला डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविका, ग्रामीण भागातील आशा वर्कर्स् यांच्या पुढे मी नतमस्तक होतो म्हणत धनंजय मुंडेंनी तुम्ही केलेल्या कार्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही, असे म्हणत कौतुक केचले. दुसर्या लाटेने माणुसकी जीवंत केल्याचे सांगून भगवंता तिसरी लाट येऊ देऊ नको, म्हणत आज जरी कोरोनाचे आकडे कमी असले तरी तिसरी लाट रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा, कुटुंबियांची काळजी घ्या, लस टोचून घ्या, असे आवाहन त्यांनी या वेळी उपस्थितांना करून कोरोना योद्धांचे तोंडभरून कौतुक केले.
अमरसिंह म्हणाले….

आपल्या प्रास्ताविक भाषणात अमरसिंह पंडित म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधीलकी जोपासत सिव्हिल सोसायटीने मोलाचे काम केले त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे. गेवराई तालुक्यातील आनेक जवळची माणसं या कोरोनाने नेली, त्या परिवराचे सांत्वन करायला त्यांच्या घरी जाता येत नाही अशी खंत व्यक्त करुन. माझ्या 27 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मला साथ देणारे आनेक सहकारी गेले त्यांच्या परिवाराला भेट देण्याची माझी हिम्मत होत नाही असे म्हणत ते भावनिक झाले. कोरोना रुग्णांना गेवराईतच उपचार देण्यासाठी 200 खाटांचे शारदा कोविड केअर सेंटर, 70 खाटांचे महिला कोविड केअर सेंटर उभा केल्याचे सांगत त्यामध्ये काम करणारे सर्व डॉक्टर, पारिचारीका, वार्ड बाँय, आशा स्वयसेविका यानी जिवाची पर्वा न करता अमुल्य असे काम केले त्यांचे मी आभार मानतो असे सांगत उसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह योजना मंजूर करुन गेवराईला 100 मुलाचे, आणि 100 मुलीचे वसतीगृह मंजूर केल्याबद्दल त्यांनी ना. धनंजय मुंडे यांचे आभार माणले.