मोदींचे शैक्षणीक धोरण महाराष्ट्रात; शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची माहिती
बीड (रिपोर्टर)ः- पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आखलेल्या नविन शैक्षणीक धोरणाचा महाराष्ट्रातील शिंदे, फडणवीस सरकारने स्विकार करत येत्या शैक्षणीक वर्षापासून ते नविन शैक्षणीक धोरण राज्यभरात राबवले जाण्याची माहिती शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी दिली. या नव्या शैक्षणीक धोरणानूसार येत्या वर्षापासून दहावी आणि बारावीला बोर्ड राहणार नाही. तर शैक्षणीक धोरणात चार टप्पे पाडले असून पहिला टप्पा पाचवी, दुसरा टप्पा आठवी, तिसरा टप्पा, अकरावी, आणि चौथा टप्पा हा पदवीचे तृतीय वर्ष असे ठरवण्यात आले असून वैद्यकीय आणि अभियांत्रीक शिक्षण हे मराठी माध्यमातूनही दिले जाणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे. तसेच, इंजिनियरिंग मेडिकल ही या पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे. शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्त्वाचे ठराव यासाठी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. राज्य सरकारही याची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मोदी सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवं शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत 10+2 असं होतं. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल, असा उल्लेख केलेला नाहीत. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार, कसे असतील शैक्षणिक वर्षाचे टप्पे?
पहिल्या टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्ष : पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी
दुसर्या टप्पा म्हणजे पुढील तीन वर्ष : इयत्ता तिसरी ते पाचवी
तिसर्या टप्पा म्हणजेच त्यानंतरची तीन वर्ष : सहावी ते आठवी
चौथ्या टप्पा म्हणजेच उर्वरित चार वर्ष :
नववी ते बारावी
नव्या शैक्षणिक
धोरणातील आणखी वैशिष्ट्ये
10+2 ऐवजी आता शिक्षणाचा 5 +3 +3+ 4 पॅटर्न
पाचवीपर्यंत शिक्षण मातृभाषेत, प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच
पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न
सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश
विद्यार्थ्यांचं ते स्वत:, सहविद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार
विद्यार्थ्यांचं ते स्वत:, सहविद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार
शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर
पदवीसाठी कला आणि विज्ञानात भेद न राखता विषय
निवडण्याची मुभा
सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता
शालेय आणि शिक्षकांचा अभ्यासक्रमही आता बदलणार