कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन
धारूर (रिपोर्टर) – धारूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये काल एकाने गोंधळ घालत कर्मचार्याशी अरेरावी केली. या प्रकरणी धारूर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अद्यापही आरोपीला अटक केली नसल्याने आरोपीच्या अटकेसाठी आज कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे बाह्यरुग्ण विभागाचे प्रचंड प्रमाणात हाल झाले होते. (पान 7 वर)
काल एका तरुणाने रुग्णालयात येऊन कर्मचार्याशी अरेरावी केली. या प्रकरणी कर्मचार्यांनी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नसल्याने कर्मचार्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकून रुग्णालयासमोर आंदोलन केले. सदरील आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी कर्मचार्यांच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनामुळे बाह्य रुग्ण विभागाचे कामकाज ठप्प झाले होते.