बीड (रिपोर्टर)ः- प्रशासनाच्या वतीने सर्व कारभार ऑनलाईन करण्याचा जोरदार सुरू असला तरी या ऑनलाईन प्रकियेत अनेक अडथळे येत असून या अडथळ्यामुळे संबधीतांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सौर ऊर्जासाठी कित्येक शेतकरी फॉर्म भरतात. फॉर्म भरल्यानंतर ओटीपी नंबर येत नाही. सदरील हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न सबंधीत विभागाने करायला हवा.
विजेविना विद्युत मोटार चालवण्यासाठी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचा आवाहन शासनाच्यावतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक शेतकर्यांनी सौरपंप घेतले. सौरपंपासाठी शासनाकडून सवलत दिली जात आहे. शेतकरी विजेच्या त्रासाला कंटाळून सौरपंप खरेदी करु लागले. सध्या पंपासाठी ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत. मात्र अर्ज भरल्यानंतर ओटीपी नंबर येत नसल्याचे समोर येवू लागले. ओटीपी नंबर का येत नाही याकडे सबंधीत अधिकार्यांनी लक्ष घालून ऑनलाईन प्रकिया व्यवस्थीत करुन शेतकर्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान ज्या शेतकर्यांना अडचणी निर्माण होतात त्या शेतकर्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न प्रकल्प अधिकारी गांधीरे सर, रामेश्वर तिडके, राज बेदरे हे करत असल्याचे दिसून येत आहे.