बीड (रिपोर्टर) युसुफवडगाव ठाण्याच्या हद्दीतील चिंचपूर येथे गांज्याची शेती उघडकीस आली असून या ठिकाणी सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड टाकून 1 लाख 24 हजाराचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी सत्यपाल ग्यानबा घुगे यांच्या विरोधात युसुफवडगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना चिंचपूर येथील सत्यपाल ग्यानबा घुगे यांनी आपल्या शेतात गांज्याची झाडे लावल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून काल पंकज कुमावत यांनी स्वत त्याठिकाणी धाड मारली असता 24 किलो 830 ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त करत सत्यपाल ग्यानबा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.ही कारवाई युसुफवडगाव ठाण्याचे स.पो.नि. योगेश उबाळे, पो.उप.नि. काळे, सहायक फौजदार राठोड, पो.हे.कॉ. खेडकर, डोंगरे, म्हेत्रे, उपविभागीय कार्यालयातील सहायक फौजदार शेषेराव यादव, मुकुंद ढाकणे, बालाजी दराडे, राजू वंजारे यांनी केली.