Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोना‘खेलरत्न’शी गांधींचा संबंध नाही, मग तुमचा लस निर्मितीशी काय संबंध? मोदीजी, लसीकरणाच्या...

‘खेलरत्न’शी गांधींचा संबंध नाही, मग तुमचा लस निर्मितीशी काय संबंध? मोदीजी, लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर तुमच्या फोटोपेक्षा लस निर्मिती करणार्‍या शास्त्रज्ञांचा फोटो का नाही?

स्व.राजीव गांधींचा खेळाशी संबंध नाही म्हणून लोकआग्रहास्तव खेलरत्न पुरस्काराचे नाव बदललेे, महान हॉकीपटू जादुगार मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले, उभ्या देशाने या निर्णयाचे स्वागत केले, कोरोनाने मृत्यू पावलेल्या लोकांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर तुमचा फोटो नाही परंतु लसीकरणावर तुमचा फोटो
बीड (रिपोर्टर):- लोकांच्या आग्रहाखातर स्व. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे असलेला खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद या नावाने हा पुरस्कार यापुढे देण्यात येणार आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या निर्णयाचे देशभरातून स्वागत झाले. राजीव गांधी आणि यांचा खेळाचा संबंध नाही, म्हणून खेलरत्न पुरस्काराचे नामांतर केले आणि हॉकीमधील महान हॉकीपटु मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले. याबद्दल मोदींचे जाहीर अभिनंदन. परंतु मोदी साहेब कोरोना महामारीने देशातील एक लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूपत्रावर फोटो न छापता लसीकरणाच्या तिन्ही प्रमाणपत्रावर मात्र आपला फोटो छापून येत आहे. जसे राजीव गांधींशी खेळाचा संबंध नाही तसा तुमचाही लस निर्माण करण्यात काडीचा संबंध नाही. त्या प्रमाणपत्रावर फोटो छापायचाच असेल तर लस निर्माण करणार्‍या एखाद्या शास्त्रज्ञाचा फोटो छापा, अशी जाहीर चर्चा आता सोशल मिडियावर होताना दिसून येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देश चालविण्याची पद्धत म्हणजे ‘शेतात काय पिकतय यापेक्षा बाजारात काय विकतय’ याला महत्व देणारी आहे. देशाच्या विकासापेक्षा ध्येय-धोरणापेक्षा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या उपाययोजना आणि त्याचे मार्केटिंग याला अधिक महत्व भारतीय जनता पार्टीमध्ये दिले जाते. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा काल-परवा उभ्या देशाने पाहितला. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचा खेळाशी संबंध नाही त्यामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा लोकांच्या आग्रहाखातर महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने यापुढे लोकआग्रहास्तव दिला जाणार असल्याचं ट्विट स्वत: पंतप्रधानांनी केलं. त्यांच्या या निर्णयाचं देशभरातून स्वागत झालं. आम्हीही या निर्णयाचं स्वागत करतो. मेजर ध्यानचंद हे हॉकीमधील जादुगर होते. त्यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार हा एखाद्या खेळाडुसाठी रत्नजडीत हारच म्हणता येईल. जसे खेळाशी राजीव गांधींचा दुरास्तव संबंध नव्हता तसा कोरोनाची लस शोधून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दुरास्तव संबंध नाही. असे असतानाही हयात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात सुरू असलेल्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आपला फोटो छापून आणतात. खरं पाहिलं तर लोकांना जीवदान देणार्‍या या लसीचे श्रेय लस शोधून काढणार्‍या शास्त्रज्ञाचं असायला हवं. लस घेणार्‍या प्रत्येक भारतीयाच्या प्रमाणपत्रावर त्या शास्त्रज्ञांचे फोटो यायला हवेत. परंतु इथं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:चा फोटो छापून बडवून घेत असल्याचे आता उघड उघड बोलले जात आहे. कोरोनाच्या लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींना स्वत:चा फोटो छापून श्रेय घ्यायचं असेल तर गेल्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये देशभरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एक लाखापेक्षा जास्त देशवासियांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर पंतप्रधानांनी आपला फोटो छापायला हवा, परंतु मृत्यूचे श्रेय घ्यायचे नाही आणि लस निर्माण करण्यात काडीचाही संबंध नसताना तिथे मात्र श्रेय घ्यायचे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचे दुटप्पी दोरण आता उभा देश पहात आला आहे. स्व. राजीव गांधी यांच्या नावाने असलेला खेलरत्न पुरस्कार केवळ त्यांचा खेळाशी संबंध नसल्यामुळे बदलला जातो तर मग लस निर्मितीत पंतप्रधानांचा संबंध नसताना प्रमाणपत्रावर त्यांचा फोटो कसा येतो? हा सवाल आता उभा देश विचारतोय.
ममता दिदीचे
धाडस आणि स्वार्थ

उभ्या देशात कोरोना लसीकरण चालू आहे. देशातल्या सर्व राज्यांमध्ये लस घेतलेल्या व्यक्तीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापून येतो परंतु देशातला एकमेव पश्‍चिम बंगाल असा राज्य आहे, ज्या राज्यामध्ये लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापून येत नाही. तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांचा फोटो काढण्याचं धाडस केलं परंतु तिथंही ममता दिदींनी थोडा स्वार्थ बाजुला ठेवला असता पंतप्रधानांच्या जागी स्वत:चा फोटो न लावता लस निर्माण करणार्‍या शास्त्रज्ञांच फोटो लावला असता तर ते बरं झालं असतं.

Most Popular

error: Content is protected !!