माजलगांव(रिपोर्टर):-नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी.या मागणीसाठी कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर याप्रमाणे बीड जिल्ह्यातील गायरान धारक 1970 पासुन जमिन कसुन आपल्या कुटुंबीयांची उपजीवीका भागवीत आहेत. भुमिहीन गायरान धारक कसत असलेल्या गायरान जमिनी नावे करण्यासाठी मुळ कागदपत्रे व पुराव्यासह प्रस्ताव दाखल करुन पाठपुरावा करीत आहेत. परंतु अलीकडच्या काळात पंजाब न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेऊन राज्यसरकार भुमीहीन, गायरान धारकांना जमिनीपासुन व घरांपासुन बेघर करण्यासाठी नोटीसा देउन अन्याय करत आहे. या गायरान धारकांना देण्यात आलेल्या नोटीसीला तात्काळ स्थगिती देऊन निर्णय मागे घेण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी वतीने माजलगांव तहसिल कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे राजू तुपारे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 12: 00 वाजता नवीन बस स्टॅन्ड येथुन ,छत्रपती शिवाजी चौक बाजार रोड मार्गे तहसिल कार्यायावर धडकला. या आंदोलनात विविध मागण्या घेऊन शेकडो गायराणधारक सहभागी झाले होते. यातील प्रमुख मागण्या अक्षय भालेराव यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. कसत असलेल्या गायरान धारकांना दिलेल्या नोटीसा तात्काळ रद्द कराव्यात ज्या गायरान धारकांना सात बारे मिळाले आहेत त्यांच्या 7/12 वर पोटखराबा येत आहे तो पोटखराबा काढुन टाकण्यात यावा.
सरकारी गायरान जमिनीवर बांधण्यात आलेल्या घरांना दिलेल्या नोटिसा रद्द करण्यात याव्यात यासह आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.