Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडमराठा, धनगर समाजासाठी भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं प्रेम आहे

मराठा, धनगर समाजासाठी भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं प्रेम आहे


मुंबई (रिपोर्टर):- मराठा समाज आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील वातावरण तापलं आहे. दोन्ही समाजांसोबतच भाजपाकडून देखील या मुद्द्यावरून राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेमध्ये १२७व्या घटनादुरुस्तीनुसार डएइउ संदर्भात मागास समाज ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारांकडेच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र, यासंदर्भात भाजपानं घेतलेल्या भूमिकेवरून आता शिवसेनेनं तीव्र शब्दांत सुनावले आहे. मराठा आणि धनगर समाजावरचं भाजपाचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना खासदारांनी लोकसभेचं कामकाज स्थगित झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी ही टीका केली.

१२७ व्या घटनादुरुस्तीने सर्व अधिकार पुन्हा राज्यांना देताना राज्यांना आरक्षण देताना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता केंद्रानं घ्यायला हवी होती. पण दुर्दैवाने असं झालेलं नाही. घटनादुरुस्ती विधेयकामध्ये स्पष्टता नाही. अनेक शंका त्यातून निर्माण होऊ शकतात, असं राऊत म्हणाले.राज्य सरकारांना ५० टक्क्‌यांची मर्यादा ओलांडण्याची गरज भासली, तर ती मुभा राज्य सरकारांना असायला हवी. राज्यातलं मराठा, धनगर आरक्षण, जाट समाज, पटेल समाज, गुर्जर समाज यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचं असल्यास ५० टक्क्‌यांची मर्यादा ओलांडायची गरज पडेल. त्या वेळी या विधेयकाचा उपयोग होणार नाही, असं देखील विनायक राऊत यांनी नमूद केलं.

Most Popular

error: Content is protected !!