कामगारांचे कार्यालयासमोर आंदोलन
नेकनूर (रिपोर्टर): तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतच्या सफाई कामगारांचा नऊ महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आज पगारासाठी महिला कामगार ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या. या आंदोलनाकडे ग्रामसेवकाने मात्र दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नेकनूरची ग्रामपंचायत तालुक्यात सर्वात मोठी आहे. या ग्रामपंचायतमध्ये आठवडी बाजार भरतो. ग्रामपंचायतचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. ग्रा. पं.अंतर्गत साफसफाईसाठी महिला कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र या महिला कामगारांना गेल्या नऊ महिन्यापांसून पगार देण्यात आला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पगारासाठी महिला कामगार आजपासून ग्रा.पं. कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत. या आंदोलनाकडे ग्रामसेवक मात्र फिरकले सुद्धा नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.