Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeआरोग्य & फिटनेसकोरोना कमी झाला, व्हायरलचा ताप वाढला

कोरोना कमी झाला, व्हायरलचा ताप वाढला


सर्दी,खोकल्याने नागरीक त्रस्त; सरकारी
दवाखान्यासह खासगी रूग्णालय हाऊसफुल्ल
बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून अवघ जग त्रस्त आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून राज्यामधील कोरोना रूग्णांची संख्या कमी-कमी होत असल्याचे रोजच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे. कोरोना कमी झाला असला तरी व्हायरलचा ताप मात्र वाढला. सध्याचं वातावरण पाहता अनेक नागरीकांना ताप, सर्दी, खोकला येत असल्याने यामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. शासकीय रूग्णालयासह खासगी रूग्णालय हाऊसफुल झाले आहेत.


गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. या संसर्गामुळे अवघं जग त्रस्त आहे. कोरोनाचा अद्यापही पुर्णत: नायनाट झालेला नाही. कोरोना आटोक्यात आला आहे. रूग्ण संख्या कमी झाली. गेल्या पंधरा दिवसात अधिकच रूग्णांची संख्या घटली आहे. संख्या कमी झाल्यामुळे शासनाने रात्री दहा वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहे. कोरोना कमी झाला असली तरी व्हायरलचा ताप मात्र वाढला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसात दरवर्षी व्हायरल इन्फेक्शन वाढत असतं, गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हे वातावरण रोगराईला आमंत्रण देणारं आहे. या अशा दुषित वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापीचे रूग्ण वाढले आहे. ज्याला-त्याला व्हायरल ताप जडल्याने शासकीय रूग्णालयासह खासगी रूग्णालय हाऊसफुल झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!