भाई गंगाभीषण थावरे यांच्या आंदोलनाला यश
माजलगाव (रिपोर्टर): जून महिना उलटत आला तरी अद्यापही बीड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नसल्याने उसासह इतर पिके सुकू लागले आहे. माजलगाव धरणातून पिकांना पाणी सोडावे, अशी मागणी भाई गंगाभीषण थावरे यांनी केली होती. या मागणीची दखल संबंधित विभागाने घेतली असून आज धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेतकर्यांचे पिके वाचणार आहेत.
माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड आहे. या तालुक्यात दरवर्षी तीन कारखाने चालतात. यंदा अजूनही बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात पाऊस पडला नाही. पाऊस लांबल्यामुळे उन्हाळी पिके सुकू लागली. माजलगाव धरणातून पिकांसाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी भाई गंगाभीषण थावरे यांनी केली होती. त्याचबरोबर पाणी न सोडल्यास धरणात उड्या मारण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यांच्या या मागणीची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली असून आज धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्याने तालुक्यातील शेतकर्यात समाधान व्यक्त केले जात आहे.