जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात
बीड (रिपोर्टर): बीड शहरासह जिल्हाभरात बकरी इद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी सकाळी नियोजीत वेळेनुसार मस्जिदसह इदगा मैदानात नमाज आदा केली. मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोख्यासाठी आणि समाजात एकता निर्माण राहावी यासाठी अल्लाहाकडे दुऑ मागितली. दरम्यान आज आषाढी एकादशी असल्याने कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. त्यामुळे आज फक्त नमाज आदा करण्यात आली.
आज देशभरामध्ये बकरी इद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बीड शहरासह जिल्हाभरातही इद साजरी करण्यात आली. आज सकाळी नियोजीत वेळेनुसार मुस्लिम बांधवांनी मस्जिदसह इदगा मैदानात इदची नमाज आदा केली. नमाजनंतर दुआ झाली. समाजामध्ये सलोखा आणि एकता निर्माण रहावी यासाठी आल्लाहाकडे दुऑ मागण्यात आली. इदच्या नमाजनंतर एकमेकांना अलिंगन देत शुभेच्छा देण्यात आल्या. बकरी इद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा यापूर्वीच निर्णय घेतला होता. त्यानुसार आज कुर्बानी न देता उद्या कुर्बानी देण्यात येणार आहे. आज फक्त नमाज आदा करण्यात आली. इदगा स्थळी शुभेच्छा देण्यासाठी आमदार संदिप क्षीरसागर, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, माजी आमदार सय्यद सलिम यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.