Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडपुलासाठी गावकर्‍यांचे अर्धनग्न होऊन आंदोलन आंदोलनात सरपंचासह गावकर्‍यांचा सहभाग

पुलासाठी गावकर्‍यांचे अर्धनग्न होऊन आंदोलन आंदोलनात सरपंचासह गावकर्‍यांचा सहभाग


गेवराई (रिपोर्टर) गेवराई ते चकलंबा रोडवरील पौळाचीवाडी येथील पुल वाहून गेल्याने मोठा खड्डा पडला असून यात पाणी साचल्याने ते दिसून येत नसल्याने या ठिकाणाहून ये-जा करणार्‍या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत असल्याने याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही याकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने आज पौळाचीवाडी येथील सरपंच युवराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेवराई विश्रामगृह येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सरपंच युवराज जाधव यांच्यासह राजेंद्र जाधव, कृष्णा जाधव, गणेश वडते, रमेश राठोड, बंडू घाडगे, दिलीप राठोड, सतीश राठोड,पांडुरंग मुळे,बंडू शेंडगे, अमोल राठोड, कृष्णा राठोड,अनील राठोड, सतिष राठोड, अशोक पौळ, अशोक राठोड, नारायण धुमाळ, नवनाथ पोळ, सिद्धू पवळ,संतोष जाधव,दत्ता जाधव यांच्यासह आदींचा सहभाग होता. दरम्यान तात्काळ या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल असे आश्‍वासन बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!