जिल्हाधिकार्यांनी शिक्षण विभागाला झापझाप झापले
बीड (रिपोर्टर): इन्फंट इंडिया येथील मुलांना पाली येथील शाळेत बसू देण्यास गावकर्यांनी विरोध दर्शत काल गावातील लोकांनी शाळेला चक्क कुलूप ठोकले. त्यामुळे आज इन्फंटचे बारगजे यांनी आपली शाळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भरविली. सदरील ठिकाणी जिल्हाधिकारी आल्यानंतर त्यांनी याबाबत शिक्षण विभागाला चांगलेच झापले. हा प्रश्न तत्काळ निकाली काढला असता तर या ठिकाणी मुलं आणण्याची वेळ संबंधितांवर आली नसती, असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी शिक्षण विभागाला दिले.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या इन्फंट इंडिया येथील मुले पालीच्या जि.प. शाळेमध्ये जात होते, या मुलांच्या शाळेत येण्यास गावकर्यांनी विरोध दर्शविला. काल जि.प. शाळेला गावकर्यांनी कुलूप ठोकले. त्यामुळे इन्फंट इंडियाचे बारगजे यांनी आपले मुले थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. या ठिकाणी त्यांनी शाळा भरविली. कार्यालयात जिल्हाधिकारी मुंडे आले असता त्यांनी सदरील प्रकाराबाबत शिक्षण विभागाला जाब विचारून चांगलेच खडसावले. हा प्रकार शिक्षण विभागाने तत्काळ मिटवला असता तर या ठिकाणी शाळा भरवण्याची गरजच भासली नसती,अशा शब्दांत त्यांनी झापले. तसेच शिक्षण विभाग, गावकरी यांची बैठक त्यांनी बोलावली आहे.