Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडरोहयोमध्ये ताळमेळ नाही, मंत्र्याने अधिकार्‍यांना झापले, जिल्हाधिकार्‍यांना लक्ष घालण्याचे दिले ना....

रोहयोमध्ये ताळमेळ नाही, मंत्र्याने अधिकार्‍यांना झापले, जिल्हाधिकार्‍यांना लक्ष घालण्याचे दिले ना. भुमरेंनी आदेश


तालुक्याच्या अधिकार्‍यांना अभ्यास कमी,दोषी अधिकार्‍यांना नोटीसा बजवा
बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची अवस्था अत्यंत वाईट आहे, फक्त घरकुलाच्या कामातच मजूर दिसतात, इतर कामात मजूर दिसत नाहीत. जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही स्वत: रोहयोमध्ये लक्ष घालून दोषी अधिकार्‍यांना नोटीस बजवा असे सक्तीचे निर्देश रोहयो फलोत्पादन मंत्री संदीपान भुंबरे यांनी दिले आहेत.


रोहयो मंत्री भुंबरे हे बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयोच्या कामाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांना रोहयोत अनेक त्रुटी आढळून आल्या. भुंबरे म्हणाले की, जिल्ह्यात फक्त घरकुलाच्या कामातच मजूर दिसून येत आहेत. इतर ठिकाणी मजूर दिसत नाहीत. केजमध्ये ४ हजार, अंबाजोगाईत ९०६ मजूर दिसत आहेत. इतर तालुक्यात मजुरांची संख्या का दिसत नाही? असा प्रश्‍न त्यांनी अधिकार्‍यांना उपस्थित केला. भुंबरे यांच्या प्रश्‍नांना तालुक्याच्या गटविकास अधिकार्‍यांना उत्तरे देता आली नाहीत. जिल्हाधिकारी साहेब, तुम्हीच आता या प्रकरणात लक्ष घालून निष्क्रीय अधिकार्‍यांना नोटीसा बजावण्याचे आदेशही भुंबरे यांनी दिले आहेत. दरम्यान, आष्टीचे गटविकास अधिकारी अनत्रे यांना प्रश्‍नांची उत्तरे देता आली नसल्याने त्यांना तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश भुंबरे यांनी बैठकीत दिले. या बैठकीला आ. संजय दौंड, आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी शर्मा, सीईओ अजित पवार, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, प्रवीण धरमकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!