बीड (रिपोर्टर): गेल्या तिन वर्षाच्या प्रदिर्घ काळात बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेत आपल्या कर्तव्याची चुनूक दाखवणारे पोलिस उपनिरिक्षक भगतसिंग दुल्लत यांची औरंगाबाद ग्रामीण येथे विनंती बदली झाली. त्यांनी बीडमध्ये विविध गुन्हे उघड केले आहेत. अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्यात त्यांना यश आले.
स्थानिक गुन्हे शाखेत कर्तव्याची चुनूक दाखवण्याची मोठी संधी असेते. पोलिस उपनिरिक्षक भगतसिंग दुल्लत हे गेल्या तीन वर्षापासून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांनी तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय भारत राऊत, सतिष वाघ, आणि संतोष साबळे यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेत कर्तव्य बजावत विविध गुन्ह्याचा तपास केला. अनेक ठिकाणी धाडी टाकत चोरट्यांना सळो की पाळो करुन सोडले. त्यांच्या या कामाची वरिष्ठांनी वेळोवेळी दखल घेतली. मंगळवारी त्यांची विनंती बदली औरंगाबाद ग्रामीण येथे झाली.