कृषी दुकानदारांकडून शेतकर्यांची लूट; कृषी विभाग मात्र वसुलीत दंग
गेवराई – वेळेवर मुबलक प्रमाणात पाऊस होईल, या आशेवर रान शिवार तयार करून सज्ज झालेल्या शेतकर्यांना पावसाने हुलकावणी दिली आहे. वरून राजा रूसल्याने पावसाच्या सरी ऐवजी शेतकर्यांच्या डोळ्यातून अश्रुंचा थेंब पडेल की काय? अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. 7 जून पासून च्या 12 दिवसात केवळ दोनच दिवस चांगला पाऊस पडला होता. चांदण सर्या पावसाळी वातावरणात काही शेतकर्यांनी रिस्क घेत पेरणी केली आहे. मात्र, पावसाने अचानक पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहीले आहे. मराठवाडा विभागातल्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याचे चित्र आहे. दरम्यान, शनिवारी दि.18 रोजी रात्री गेवराई तालुक्यातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे, थोडाफार दिलासा मिळाला आहे. दुरीकडे कृषी दुकानदारांकडून शेतकर्यांची लूट होत असून कृषी विभाग मात्र दुकानदारांकडून वसुली करण्यात दंग असल्याचे दिसून येत आहे.
गेवराई तालुक्यात एकूण 1 लाख 47 हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. तालुक्यात पेरणी लायक 1 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्र असून गेवराई परीसरात मादळमोही, चकलांबा, रेवकी, तलवाडा, घाँडराई, पाचेगाव, उमापूर, जातेगाव, सिरसदेवी अशी दहा महसुली मंडळ आहेत. या मंडळात सर्वाधिक क्षेत्रात ऊस आणि कापुस लागवडीवर भर असतो. या वर्षात ही तेच चित्र दिसतेय. उलट ऊस उत्पादक शेतकरीवर्ग वाढलाय. नगदी आणि त्यामानाने कमी मेहनत म्हणून त्याकडे पाहिले जाते.
यंदा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे, पेरणीची लगबग सुरू झाली होती. बिबियाणे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होती. आता मात्र, आभाळाकडे पहावे लागत आहे. पिकांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. दोन-चार दिवसांत पाऊस न आल्यास शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती असून शेतकरी वर्गात चिंतेचे ढग आहेत. शेतकर्यांनी ऊसणवारी करून पेरणीसाठी बी-बियाणे , खते , लागवड आदीवर मोठा खर्च केला असून संक्रांत येते की काय ? या चिंतेत सध्या शेतकरी राजा दिसून येत आहे. तालुक्यात खरीप हंगामात जवळपास 9 0 हजार हेक्टरवर पेरणी होते. यंदाच्या हंगामात गेवराई परीसरात कपाशी , तूर , बाजरी , सोयाबीन, मटकी, मूग, आदी पिकांचा पेरा झाला आहे. मात्र, पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने पेरले ते उगवते की नाही, अशी स्थिती आहे. काही ठिकाणी पिकांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. पण, अशा पिकांना तात्काळ पाण्याची गरज आहे. आधीच कडक ऊन होते. त्यामुळे, जमिनीत उष्णतामान आहे. काही शेतकरी चांगला पाऊस होईपर्यंत थांबले आहेत. अजून ही रान शिवार निटनाटके करण्याची घाई केली जात आहे. यावर्षी सुरुवातीलाच पावसाने आशा पल्लवित करून, शेतकर्यांना पेरते व्हा, म्हणून संदेश दिला होता. दोन दिवस जोरदार पाऊस पडला. शेतकर्यांनी उत्साहात पिकांची पेरणी केली आहे. या वर्षी ही ऊस आणि कापुस लागवडीवर भर दिलेला आहे. अचानक, पाऊस थांबल्याने, शेतकरी हतबल झाला असून नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पुढच्या दोन – चार दिवसांत पाऊस आवश्यक आहे नसता दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाचा शेती खर्च गेल्या हंगामा पेक्षा जास्त आला आहे. नांगरट,मोगडा, रोटा, शेत पाळीचा खर्च डिझेल वाढल्याने वाढला आहे. जेसीबी ने शेती कामे करायला तासाला एक हजार सहाशे रुपये खर्च आला आहे. शेती काम करणार्या महिला कामगारांनी दोनशे ते तीनशे रु रोज दिवसाकाठी मिळवला आहे. मात्र चांदण सर्या पावसाळी वातावरणात काही शेतकर्यांनी रिस्क घेत पेरणी केली आहे. पावसाने अचानक पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहीले आहे. मराठवाडा विभागातल्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याचे चित्र आहे. वरून राजा रूसल्याने पावसाच्या थेंबा ऐवजी शेतकर्यांच्या डोळ्यातून अश्रुंचा थेंब पडेल की काय ? अशी भयावह स्थिती निर्माण झाली असून, चिंता व्यक्त केली जात आहे.
तालुका कृषी अधिकारी म्हणजे
आसुन अडचण नसून खोळंबा
गेवराई तालुका कृषी अधिकारी पद हे रिक्त असल्याने गेल्या वर्षभरात तीन ते चार जणांनी या पदावर प्रभारी म्हणून काम केल्याने शेतकर्यांत नुसता गोंधळ उडत होता. मात्र मागील महिन्यात या पदावर वडकुते नावाचे तालुका कृषी अधिकारी म्हणून रुजू झाले आसून ते कधीच शेतकर्यांना कार्यालयात दिसून येत नाहीत तर अधिकारीच हजर नसल्याने कर्मचारीही विविध योजनेच्या नावाखाली वसुली करत शेतकर्यांची लूट कर असल्याचे दिसून येत आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर हे अधिकारी कार्यालयात भेटत नसल्याने शेतकर्यांची कामे खोळंबली जात आसल्याने हे तालुका कृषी अधिकारी म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार आहे.