Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeक्राईमइंजिनिअरची गळफास घेऊन आत्महत्या बीड शहरातील बँक कॉलनी भागातील घटना

इंजिनिअरची गळफास घेऊन आत्महत्या बीड शहरातील बँक कॉलनी भागातील घटना

बीड (रिपोर्टर)- दिवाळीनिमित्त बीडला आलेल्या एका २८ वर्षीय इंजिनिअरने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बँक कॉलनी भागात घडली. इंजिनिअरने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही.
ज्ञानेश्‍वर बापूराव माने (वय २८) हा तरुण इंदोरला इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. तो गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी दिवाळीनिमित्त बीडला आला होता. रात्री त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील प्रकार समोर आल्यानंतर याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Most Popular

error: Content is protected !!