बीड (रिपोर्टर) माजलगांव तालुक्यातील चिंचाली येथील एका महिला शेतकर्याने विजेचे पंपासाठी कोटेशन भरले होते. त्या शेतकर्याला विजेची जोडणी न करुन देता विज वितरण कंपनीने 60 हजार रुपयाचे बिल दिले आहे. याबाबत महिला शेतकर्याने विज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली.
शेवंताबाई लहूजी झिंजुर्डे रा.नागडगांव ता.माजलगांव या महिलेची जमीन चिंचोली शिवारात आहे. शेतातील तिन एचपी पंपासाठी त्यांनी विज वितरण कंपनीकडे 2013 साली कोटेशन भरले होते. कोटेशन भरल्यानंतर त्यांना अद्याप पर्यंत विजेचे जोडणी करुन देण्यात आली नाही. विजेची जोडणी करुन न देताच विज वितरण कंपनीने 60 हजार रुपयाचे बिल दिले याबाबत शेतकर्याने संबधीतांकडे विचारणा केली असता अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतात. झिंजुर्डे यांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली.