Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडबिबट्याच्या हल्यात प. स पती ठार

बिबट्याच्या हल्यात प. स पती ठार

आष्टी- ऑनलाईन रिपोर्टर

बीड जिल्हातील आष्टी तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढले  असून सुरडी येथील पंचायत समिती सदस्य आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ते जागीच ठार झाले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मोराळा ता आष्टी पंचायत समिती गण सदस्या आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे हे सुरुडी येथील रहिवाशी असून ते दुपारी दोन वाजता घरून वाघ दरा या आपल्या शेताकडे पाणी देण्यासाठी गेले होते.सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गर्जे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर तेओरडले होते .मात्र मदत न मिळाल्याने बिबट्याने त्यांचा जीव घेतला. त्यानंतर मात्र सायंकाळ पर्यंत ते न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह शेताकडे आढळून आला.
बिबट्याच्या हल्ल्यात चेहरा आणि मान बिबट्याने खाल्ला होता.सर्व चेहरा छिन्न विच्छिन्न झाला होता .
ही माहिती कळताच धामणगाव येथील वैद्यकिय अधिकारी डॉ वायभासे यांनी सुरुडीला भेट दिली आणि गर्जे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी आष्टीच्या रुग्णालयात पाठविण्यात आला.

Most Popular

error: Content is protected !!