Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनामहाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्ण पॉझिटिव्ह, ३० मृत्यूंची...

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्ण पॉझिटिव्ह, ३० मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्ण पॉझिटिव्ह, ३० मृत्यूंची नोंद

ऑनलाईन रिपोर्टर 

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ५ हजार ४३९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४ हजार ८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ५८ हजार ८७९ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.६९ टक्के इतका झाला आहे. राज्यात आज ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर हा २.६१ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३ लाख ६६ हजार ५७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ८९ हजार ८०० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.सध्या राज्यात ५ लाख ३६ हजार ६४९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार २११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८३ हजार २२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ५ हजार ४३९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोना बाधितांची एकूण संख्या ही १७ लाख ८९ हजार ८०० इतकी झाली आहे.

आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रात करोना लस देण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केल्याचीही माहिती दिली. तसंच करोनाची महाराष्ट्रातली स्थिती काय आहे हेदेखील त्यांना सांगितलं. दरम्यान येत्या काळात दररोज ९० हजार टेस्ट करण्याचं लक्ष्य आहे अशी माहिती आजच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. करोनाची स्थिती आपल्या राज्यात देशाच्या तुलनेत बरीच चांगली आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

Most Popular

error: Content is protected !!