परळी (रिपोर्टर): मणिपूर येथे महिलांवर सामूहिकपणे अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपा वगळता सर्व पक्षांच्या वतीने शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.l
गेल्या काही दिवसांपूर्वी मणिपूर येथील दोन महिलांना नग्न करत त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ आज काँग्रेस, भाकप, माकप, राष्ट्रवादी, ठाकरे गट, रिपाइं, मनसे, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड यासह आदी संघटनांनी निषेध रॅली काढली होती. या रॅलीमध्ये अनेकांचा सहभाग होत. या वेळी बहादूरभाई, अजय बुरांडे, मिलिंद घाटगे, महेबूब कुरेशी, पांडुरंग राठोड, बी.जी. खाडे, गायकवाड, फुंदे, सय्यद फेरोज, शंकर शेजुळ, रणजीत देशमुख सह आदी उपस्थित होते.