बीड (रिपोर्टर): शहरातील संत सावता माळी चौक, सहयोगनगर यासह अन्य भागातील रस्त्यांवर खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अडचण निर्माण होऊ लागलीय. आज मनसेच्या वतीने नगरपालिकेच्या निषेधार्थ खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाड लावून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. हे आंदोलन शहराध्यक्ष करण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
सावता माळी चौक, सहयोगनगर, कृष्णा मंदिगर रोड, फुलाईनगर, जिजामाता चौक यासह शहरातील अन्य रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहने चालवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. मणक्याचे आजार होऊ लागले. नगरपालिका प्रशासन रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. वेळोवेळी मागणी करूनही खड्डे बुझवले जात नाहीत. त्यामुळे आज मनसेच्या वतीने रस्त्यांवर बेशरमची झाडे लावून नगरपालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी अशोक तावरे, सदाशिव बिडवे, करण लोंढे, आकाश टाकळकर, ऋषिकेश सोळंके, कार्तिक जव्हेरी, सुर्या तावरे, सुरेखाताई मुजमुले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.