Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईममांजराचे १२ दरवाजे उघडले, नदी काठच्या लोकांना इशारा

मांजराचे १२ दरवाजे उघडले, नदी काठच्या लोकांना इशारा


बर्‍याच वर्षानंतर मांजराचे १२ दरवाजे उघडण्यात आले, परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान
केज (रिपोर्टर)- बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा आधार असलेल्या मांजरा धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले असून रात्री झालेल्या पावसामुळे मांजरा नदीतून होणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. दोन दिवसांपुर्वी मांजरा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते, आता मात्र पाण्याची आवक वाढल्याने १८ पैकी १२ दरवाजे उघडण्यात आले असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रथमच धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहे.

मांजरा धरणाची साठवण क्षमता २१४ द.श.घ.मी. आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने गेल्या आठवड्यात धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते. बुधवारी आणखी एक दरवाजा उघडण्यात आला होता. त्यानंतर पाणी पातळी कमी झाल्याने चार दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र रात्री धरण क्षेत्रात धुव्वाधार पाऊस झाल्याने धरणामध्ये अतिवेगाने पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ७ वाजता धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच मिटरने उघडण्यात आले. त्यानंतरही पाण्याची आवक सुरुच राहिल्याने तब्बल १२ दरवाजे उघडावे लागले. गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच धरणाचे एवढे दरवाजे उघडण्यात आले असतील. पाण्याची आवक सुरुच राहिले धरणाचे अठरा दरवाजे उघडावे लागतील. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतकर्‍यांची पिके पाण्याखाली जावून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजमितीला धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. या भागातील अनेक नद्यांवरचे बंधारे तुटले आहेत. पुल वाहून गेले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपूर, कानडी बोरगाव येथील बंधार्‍याचे दरवाजे तुटल्याचे सांगण्यात येते.

तडोळा येथील शेतकरी वाहून गेला
मांजरा धरण पूर्णत: भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदीला मोठा पुर आलेला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथील राम बाबासाहेब कदम हे शेतकरी सोयाबीन काढण्यासाठी आपल्या शेतामध्ये गेले होते. ते शेतातून जात असताना वाहून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांचा शोध सुरू आहे.

Most Popular

error: Content is protected !!