Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडबंदीला झुगारून बीडच्या इमामपूरमध्ये बैलगाडी शर्यत शिवसेना पदाधिकार्‍यांनी फोडले नारळ, भाजपा जिल्हाध्यक्षाने...

बंदीला झुगारून बीडच्या इमामपूरमध्ये बैलगाडी शर्यत शिवसेना पदाधिकार्‍यांनी फोडले नारळ, भाजपा जिल्हाध्यक्षाने केले बक्षीस वितरण


बीड (रिपोर्टर)- राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी असताना शिवसेनेकडूएनच या बंदीला हरताळ फासली जात असल्याचे बीड जिल्ह्यात उघड झाले असून तालुक्यातील इमामपूर येथे दणक्यात बैलगाडी शर्यत साजरी करण्यात आली. २५ पेक्षा जास्त बैलगाडींनी या शर्यतीत भाग घेतला होता. या शर्यतीचे उद्घाटन शिवसेना पदाधिकार्‍यांनी केले तर बक्षीस वितरण भाजपाच्या जिल्हाध्यक्षांकडून झाले. त्यामुळे शासनाचे सर्व नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच लागू आहेत का? असा सवाल विचारला जात असून या बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय हे इमामपूरला गेल्याचे समजते.


अनेक वर्षांपासून बैलगाडी शर्यतीला राज्यात बंदी आहे मात्र बीड मध्ये सरकारच्या बंदीला जुगारून बीड तालुक्यातील इमामपूर गावात भव्यदिव्य बैलगाडी शर्यत घेण्यात आली आहे या बैलगाडी शर्यत मध्ये २५ पेक्षा जास्त बैलगाड्यानी सहभाग घेतला होता .या शर्यत मध्ये गाडी ओढणार्‍या बैलाला काट्यांनी अमानुष मारहाण करीत गाड्या डांबरी रस्त्यावर पळविल्या विशेष म्हणजे या बैलगाडी शर्यतीत सत्ताधारी शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंघन ,किसान सेनेचे पदाधिकारी परमेश्वर सातपुते शिवसेना जिल्हाप्रमुखचे बंधू गणेश खांडे या सत्ताधारी मंडळींनी या बैलगाडी शर्यतीला हिरवा झेंडा दाखवत उदघाटन केले तर भाजप जिल्हाध्यक्ष यांनी या बैलगाडी शर्यत मध्ये जाऊन प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिले त्यामुळे राज्य सरकारचे कायदे आणि नियवाली फक्त सर्वसामान्य लागू होते का असा प्रश्न उपस्थिती केला गेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना राज्य सरकारचे कायदेचे काय आहेत हे कारवाही करून सांगतील का?हा खरा प्रश्न आहे. या संदर्भात बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना विचारले असता तसेच परवानगी घेतली नाही त्यामुळे गुन्हे दाखल होतील चौकशी सुरू आहे असे फोनवरून उत्तर दिले

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!