बीड (रिपोर्टर)- राज्यात आणि बीडमध्ये धुमाकूळ घालणार्या दुचाकी चोरणार्या टोळीच्या मुसक्या बांधत चांगली कामगिरी केल्याबद्दल स्थानिक गुन्हेशाखेचे भागवत शेलार यांचा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.
बीडसह राज्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. बीडसह राज्यातील पोलीस या टोळीच्या मागावर होते. या टोळीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्या होत्या. याचा तपास करत असताना स्तानीक गुन्हेशाखेचे पोलीस नाईक भागवत शेलार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी या टोळीच्या म्होरक्यासह एकूण 16 गुन्हे उघडकीस आणले. या टोळीकडून 22 दुचाकीही जप्त केल्या. या विशेष कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, कविता नेरकर यांची उपस्थिती होती.