Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडउत्रेश्वर पिंपरी पारधी हत्या प्रकरणात गौडबंगाल मारणारे वेगळेच, पोलिसांच्या ताब्यात दुसरे ?

उत्रेश्वर पिंपरी पारधी हत्या प्रकरणात गौडबंगाल मारणारे वेगळेच, पोलिसांच्या ताब्यात दुसरे ?


जिल्हा पोलीस अधिक्षक राजा रामास्वामींसह डीवायएसपी पंकज कुमावत यांनी लक्ष घालावे
चोरीच्या आरोपावरून पारध्यांना मारणारे ‘ते’ वाळू माफिया कोण?

उत्रेश्‍वर पिंपरीत या घटनेची जोरदार उलटसुलट चर्चा
रिपोर्टरच्या प्रश्‍नाला तपासी अधिकार्‍यांचं उत्तर नाही
बीड(रिपोर्टर)- ट्रॅक्टर चोरीच्या संशयावरून मारहाणीत मृत्यू झालेल्या पारधी समाजाच्या शिवाजी नामदेव काळे यांना नेमके कोणी मारले? पोलिसांनी पारधी समाजाच्याच चौघांना जेरबंद का केले? उत्रेश्वर पिंपरीत नेमके काय घडले? यासह या हत्या प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी दबक्या आवाजात चर्चील्या जात असून शिवाजी काळे यांची हत्या करणारे मारेकरी वेगळेच असल्याचे बोलले जात आहे. उत्रेश्‍वर पिंपरी येथील वाळू माफियांसह सावकारकी करणार्‍या एका बलाढ्या धनीकाने या प्रकरणातले टॉप टू बॉटम सर्वच मॅनेज करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा होत असून पोलिसांनी शिवाजी काळे यांच्या हत्या प्रकरणात सखोल चौकशी करून खरे मारेकरी जगासमोर आणावेत.


पाटोदा तालुक्यातील पारनेरचे हत्याकांड चर्चेत असतानाच दोन दिवसानंतर केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी या ठिकाणी पारधी समाजाच्या तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. उत्रेश्वर पिंपरीतल्या या घटनेत शिवाजी नामदेव काळे हे मृत्यूमुखी पडले तर दिपक शिंदे, आकाश शिंदे हे जखमी अवस्थेत मिळून आले. सुरुवातीला गावातील काही लोकांनी या मारहाण करून
गावानजीकच्या एका नदी शेजारी फेकून दिल्याचे वृत्त आले. मात्र त्यानंतर या घटनेत अनेक संशयास्पद घटनाक्रम घडवून आणल्या गेल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात चार पारधी समाजाच्या व्यक्तींना अटक करण्यात आले आहे. फिर्यादीतही ऍडजेस्टमेंट असल्याचे बोलले जाते. उत्रेश्वर पिंपरी येथील वाळू माफियासह सावकार असलेल्या एका बलाढ्य धनिक आणि त्याच्या नातेवाईकाने ट्रॅक्टर चोरीच्या संशयातून शिवाजी काळेसह दोघांना बेदम मारहाण केली. त्यात शिवाजी काळे याचा मृत्यू झाला, असे उघडउघड बोलले जाते. रिपोर्टर कालपासून या प्रकरणातील अधिकार्‍यांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे माि यातील तपासी अधिकारी ‘आपण सुट्टीत आहोत, कामात आहोत, माझ्याकडे तपास नाही,’ असे एक ना अनेक कारणे देवून रिपोर्टरचे प्रश्‍न टालत आहेत. गावात जी चर्चा होत आहे त्या चर्चेनुसार सदरचे हत्या प्रकरणी दाबण्यासाठी यातील फिर्याद आणि पोलिसांच्या ताब्यात घेतलेलेही मॅनेज केल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर तपास होणे गरजेचे आहे. पैशाच्या जोरावर हत्या सारख्या प्रकरणात तपासात कलाटणी भेटत असेल तर हे मोठे भीतीदायक प्रकरण असून जिल्हा पोलीस अधिक्षक राजा रामास्वामींसह डीवायएसपी पंकज कुमावत यांनी जातीने लक्ष घालून या गंभीर हत्या प्रकरणातील सत्य जगासमोर आणावे.

Most Popular

error: Content is protected !!