बीड (रिपोर्टर): परळी शहरासह जिल्ह्यात गुंडगिरी करणार्या एका 30 वर्षीय आरोपीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला होता. रात्री स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने पाटोदा पोलिसांच्या मदतीने या कुख्यात आरोपीला पुण्यातून ताब्यात घेऊन परळी पोलिसांच्या स्वाधीन केले.
सिद्धार्थ भगवान देवरे (वय 38 वर्षे, रा. अशोकनगर, परळी) हा वारंवार गुन्हे करत होता. पोलिसांनी त्याला समज देऊनही तो समाजात दहशत निर्माण करण्याचे काम वारंवार करत असल्याने परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएनुसा कारवाईचा प्रस्ताव ठेवला. जिल्हाधिकार्यांनी याला मंजुरी दिल्याची कुणकुण आरोपीला लागताच तो फरार झाला होता. संभाजीनगर पोलीस त्याचा शोध घेत असताना स्था.गु.शा.ला तो पुण्यात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पाटोदा पोलीसांच्या मदतीने रात्री कुख्यात आरोपी सिद्धार्थ देवरेला पोलिसांनी ताब्यात घेत संभाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. संभाजी नगर पोलीस आरोपी सिद्धार्थला हर्सूल कारागृहात पाठविणार आहेत. ही कावाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, एलसीबीचे प्रमुख संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तुपे, पतंगे, पटोले, भागवत शेलार, कैलास ठोंबरे, राहुल शिंदे, गणेश मराडे, सचीन कोळेकर यांनी केली.