Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडहनुमंत जगताप हल्ला प्रकरणी शिवसैनीकांचे आंदोलन मुख्य आरोपीचा शोध घेवून अटक करा

हनुमंत जगताप हल्ला प्रकरणी शिवसैनीकांचे आंदोलन मुख्य आरोपीचा शोध घेवून अटक करा


बीड (रिपोर्टर)ः- शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हनुमंत जगताप यांच्यावर काही दिवसापूर्वी हल्ला झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा अद्यापही पोलीस प्रशासनाने शोध घेतला नसून त्याचा शोध घेवून त्याच्या विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचे व गावकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे.
भवानवाडीहून बीडकडे येत असतांना ३०/०८/२०२१ रोजी घोडका राजुरीच्या तलावा जवळ शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हनुमंत जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. यात काही आरोपींना अटक करण्यात आले तर यातील मुख्य सुत्रधार पोलीसांनी पकडलेला नाही. त्या सुत्रधाराचा शोध घेवून त्याला पकडण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनीक व भवानवाडी येथील गावकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. यावेळी हनुमंत जगताप, बंडु पिंगळे, परमेश्‍वर सातपुते, नितीन धांडे, बप्पा घुगे यांच्या सह आदिंची उपस्थिती आहे.

Most Popular

error: Content is protected !!